uddhav Thackeray And eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश

सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा दिलासा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षांचा पेच काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा दिलासा दिला आहे. (Shivsena Latest News)

आजच्या सुनावणीत शिवसेनेच्या निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणाचा मुद्दा समोर आला. निवडणूक आयोगाच्या वतीने दातार यांनी बाजू मांडली. यावेळी दातार यांनी 'कोणताही पक्ष निवडणूक आयोगाकडे जेव्हा धाव घेतो, तेव्हा खरा कुणाचा यावर निर्णय घेणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून, आम्ही कागदपत्रं मागितली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे." असं सुप्रीम कोर्टात सांगितलं.

यावर सुनावणी देताना शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटाला पक्षावरील दाव्यासंदर्भातील किंवा निवडणुक चिन्हासंदर्भात मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र दिसत आहे. (Eknath Shinde Todays News)

दरम्यान, शिंदे गटाकडून आम्ही शिवसेना सोडली नाही असं वारंवार दावा केला जातो आहे. शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही तर मग निवडणूक आयोगाकडे का गेला? असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्यास कपिल सिब्बल यांनी विरोध केला.

या प्रकरणाची सुनावणी याच कोर्टात व्हावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, कोर्टाने पुढच्या सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचं सांगितलं. तसेच हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यायचे की नाही हे सोमवारीच ठरवू असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT