Shivsena And Vanchit Bahujan Aghadi Alliance News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत; वंचितने ठाकरे गटाला कळवला होकार, फक्त 'ही' अडचण बाकी

Shivsena And Vanchit Bahujan Aghadi Alliance News: ठाकरे गटाने पाठवलेला प्रस्ताव हा वंचित बहुजन आघाडीने स्विकारला असून त्यांनी ठाकरे गटाला होकार कळवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर, मुंबई

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाने पाठवलेला प्रस्ताव हा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्विकारला असून त्यांनी ठाकरे गटाला होकार कळवला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी माहिती दिली आहे. (Vanchit Bahujan Aghadi Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीबाबतची चर्चा ही सकारात्मक टप्प्यावर आली आहे. शिवसेनेसोबत (Shivsena) युती करण्यासाठी तयार असल्याबाबत वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला आपला होकार कळवला कळवला आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी माहिती दिली की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यासोबत दोनदा बैठकी झाल्या, त्यानंतर वंचितने होकार कळवळा. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना ठाकरे गटासोबत मिळून निवडणुका लढवण्यास तयार आहे.

या सगळ्यात मात्र, काही अडचणी आहेत. एक म्हणजे सध्या शिवसेनेतला ठाकरे गट हा महाविकास आघाडीत सामील आहे. या आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे जर युती झाली तर, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत चौथा सहकारी म्हणून राहणार की, शिवसेना आणि वंचित एकत्र राहणार हे स्पष्ट करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं रेखाताई ठाकूर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. "प्रकाश आंबेडकर म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा धबधबा', 'आमचं आणि त्यांचं वैचारीक एकच व्यासपीठ', 'प्रबोधनकार-आंबेडकरांचा विचार पुढे नेतोय" असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT