Eknath shinde news Saam tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील; निवडणुकीनंतर नाईक पुन्हा आक्रमक

Eknath shinde news : शिंदे आणि नाईकांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय... यावेळी मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय इशारा दिलाय? शिंदे आणि नाईकांमधील वाद कसा आणि का वाढला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलंत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांचं हे विधान....महापालिका निवडणुकीत सुरु झालेला नाईक- शिंदे संघर्ष अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही...एका विशेष मुलाखतीत गणेश नाईकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत शिंदेंना जेलमध्ये जावं लागेल, असा खळबळजनक दावा केलाय...v

दरम्यान गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचेंही राजकीय अस्तित्व संपवण्याचा इशारा दिलाय... यावर श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांच्या घरात तीन माजी आहेत... त्यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये, असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय.

खरं तर महायुतीची सत्ता आल्यापासूनच गणेश नाईकांना भाजपकडून शिंदेंविरोधात बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे. नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेत शिंदेंना शह दिला होता. मनपा निवडणुकीत हा संघर्ष आणखी पेटला. नाईकांनी नवी मुंबई महापालिकेत एकहाती भाजपचे 65 नगरसेवक निवडून आणून शिंदेंवर मात केली. त्यानंतर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजपला दूर ठेऊन शिंदेंनी सत्तेचं समीकरण जुळवलं. शिंदे आणि नाईकांमधील संघर्ष शिवसेनेचे ठाण्यातील दिवगंत नेते आनंद दिघेंपासून पाहयला मिळतोय..

1995 - ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरुन आनंद दिघे आणि नाईकांमध्ये ठिणगी

1999- नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर भोईरांना ताकद देत दिघेंकडून नाईकांचा पराभव

2004- पालकमंत्री असताना नाईकांकडून एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न

2009- गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांना खासदार बनवून शिंदेंना हादरा

2014- शिंदेंनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंना ताकद देत नाईकांना पराभूत केलं

2019- पालकमंत्री असताना शिंदेंकडून नाईकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

ठाणे जिल्हा परीषदेवर भाजपची सत्ता आणणार, असा निर्धार गणेश नाईकांनी बोलून दाखवलाय. ठाणे आणि नवी मुंबईतील वर्चस्वासाठी नाईक-शिंदेंमधील संघर्ष विकोपाला गेलाय. अगदी एकमेकांचे नामोनिशाण मिटवण्याची भाषा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात असल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. महायुतीतील हा अंतर्गत वाद आणखी किती चिघळणार? नाईक- शिंदेंमधील वर्चस्वाच्या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘संत सेवालाल महाराज’ यांचे नाव

IND vs PAK : भारताकडून दारूण पराभव, पाकिस्तानात फुटले टीव्ही; सोशल मीडियावर उडाली खिल्ली

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

SCROLL FOR NEXT