Shaina NC Tears Balasaheb Thackeray Photo  saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena: निषेधाच्या नादात बाळासाहेबांचा फोटो फाडला, शिंदेंच्या नेत्या शायना एनसींचा VIDEO चर्चेत; ठाकरेसेना आक्रमक

Shaina NC Tears Balasaheb Thackeray Photo: शिवेसना शिंदेगटाच्या नेत्या शायना एनसी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

शिवसेना शिंदेसेनेच्या महिला नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांनी पुस्तकाची काही पानं फाडून टाकली. पण यावेळी शिंदेसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून मोठी चूक झाली. सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडण्याच्या नादात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. शायना एनसींचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या या कृत्याचा आता निषेध केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी शिंदेसेनेवर टीका केली.

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, 'मी एकदा नाही तर सतत हेच सांगेल की मी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला नाही तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. मणिशंकर अय्यर यांचा फोटो आम्ही सतत फाडू. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवले आणि राष्ट्रप्रेमासोबत काम करणं शिकवलं. त्यांच्या विचारधारेसोबत आम्ही आहोत. सोनिया गांधींच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ हे काढून टाकावे अशी आमची मागणी आहे. सावरकर यांचा या पुस्तकात अपमान करण्यात आला आहे तर आम्ही एकदा नाही तर १० वेळा पुस्तक फाडू.'

ठाकरेसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'मुळात ही सगळी फिरती चषकं आहेत. यांना काही बाळासाहेबांचे पडले नाही. त्यांना फक्त दुकान मांडून आपला बिझनेस करायचा आहे. शायना एनसी किती पक्ष फिरून आलेली आहे. ती चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडते तर आम्ही तिचा निषेध करतो. हे काय चालले आहे या राज्यात उपमुख्यमंत्र्यांचा यांच्यावर ताबा आहे की नाही. सुसाट सुटलेली या महिलांची गाडी आहे ही. कुणी उठते काहीही बोलते. भाजपला खूश करण्यासाठी काहीही करत आहेत. सोनिया गांधींच्या पुस्तकाचा यांनी खिस पाडला आहे. शायना एनसी बदमाशगिरीचे काम करते. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो फाडला म्हणते पत्रकार परिषदेत आणला होता. आम्ही या घटनेचा निषेध करतो. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करायचा तर करा ना याचा अर्थ बाळासाहेबांचा फोटो फाडणे असे नाही.'

ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शायना एनसी यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, या लोकांचा पुस्तकांशी काही संबंध नाही. ही सर्व माणसं सतत ट्रेंडर, कमिशन, दलाली, टक्केवारी आणि खोके याच्या पलिकडे जाणारी माणसं नाही. जो पुस्तकं वाचतो तो विवेकी असतो. विवेकी माणूस विरुद्ध विचारधारेचा असेल तरी तो पुस्तकं फाडत नाही. इतकी द्वेषबुद्धीने भरलेली ही माणसं आहेत. ज्या बाळासाहेबांच्या जीवावर हे मोठे झाले त्या वंदनिय बाळासाहेबांचा फोटो फाडला जातोय हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांची असलियत काय आहे हे ते दाखवत आहेत. या सर्वांना या कृत्याचा हिशोब चुकता करावा लागेल. यावर इतर कुणी न बोलता ज्या सर्वसामान्यांच्या काळजामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत ते यांचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही.'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या घटनेचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केलेला हा अत्यंत निंदनिय आणि विकृत प्रकार आहे. जी शिंदेसेना गद्दारसेना म्हणून ओळखली जाते, ५० खोके एकदम ओके म्हणून ओळखली जाते त्या शिंदेसेनेकडून काय अपेक्षा करणार. बाप चोरणारा आणि शिवसेना फोडणारा माणूस त्यांचा हा पक्ष आहे. यांना बुद्धी देवो अशी आम्ही प्रार्थना करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moss Removal : घराच्या गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलंय? जाणून घ्या शेवाळ काढण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: महापौर दालनाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक यांचे आंदोलन

EPS-95 Pension : मोठी बातमी! १९ नोव्हेंबरला EPFO ची महत्त्वाची बैठक; पेन्शन नाकारली जाऊ नये म्हणून समोर ठेवल्या 'या' १० मोठ्या मागण्या

अदरक सोलण्याची सर्वात सोपी ट्रिक, सुरीऐवजी वापरा चमचा

Aquan Cyclone : 'अक्वान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका? ४ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT