Maharashtra cm new update Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे सरकारची फ्लोर टेस्ट ४ तारखेला; १७० आमदारांचे समर्थन असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

शिंदे यांच्या नेतृत्वात आता राज्यात नवं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारला ४ तारखेला फ्लोर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे.

Jagdish Patil

मुंबई: राज्याच्या राजकारणात मागील जवळपास १० दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडीनंतर, काल अखेर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या नेतृत्वात आता राज्यात नवं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारला ४ तारखेला फ्लोर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे.

४ तारखेच्या फ्लोर टेस्टला (Floor Test) जायच्या आधीचं नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्याकडे १७० आमदारांचे समर्थन असून आमचं सरकार आरामात बहुमत सिद्ध करेल. शिवाय राज्याबाहेर असणारे सर्व आमदार उद्या मुंबईला (Mumbai) येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

४ जुलै रोजी सरकारची चाचणी-

शिंदे सरकार विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फ्लोर टेस्टला सामोरं जाणार आहे. या आधी ३ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना आमदार राहिल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता ४ तारखेला बंडखोर आमदांसह अपक्षांना आपल्या बाजुने वळविण्याऱ्या शिंदे यांना फ्लोर टेस्टमध्ये बहुमत मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT