Eknath Shinde News File Photos
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांवर झालेल्या टीकेनंतर 'वर्षा'वरील पाहुणचारावर चाप; जेवणाच्या किंमतीत केला मोठा बदल

Eknath Shinde Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढेच नाही, तर वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तसेच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला ५ कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी १ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या १२३ दिवसात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपये खर्च करण्यात आला. दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत असल्याची माहिती ही 'आरटीआय'मधून आली होती.

'शिंदे सरकारने होणारा वारेमाप खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा ,अशी विनंती देखीन नितीन यादव यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचबरोबर ही माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील खर्चावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शिंदे सरकारने खर्च आटोक्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी कोणते पदार्थ मिळणार?

- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पाहुण्यांसाठी साधारण व विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे.

- साधारण पदार्थांच्या यादीत ४४ पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत २९ पदार्थ आहेत.

- साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स असुन त्यासाठी कंत्राटदारास फक्त १० रुपये मिळणार आहेत.

- विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी फक्त १४ रुपये, तर मसाला दुधासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत.

- विशेष पदार्थांमध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे १५ रुपयांत दिले जाणारे पदार्थ असतील.

- महत्त्वाची बाब म्हणजे साधारण व विशेष वर्गवारीत सर्वात महाग हे शाकाहारी व मांसाहारी बफेट आहेत.

- साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी १६० रुपये, तर मांसाहारी बफेटसाठी १७५ रुपये आकारले जातील.

- विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी बफेट ३२५ रुपयांना, तर मांसाहारी बफेट ३५० रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT