Eknath shinde And Devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; हिवाळी अधिवेशनासाठी केली तात्पुरती सोय, काय आहे कारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लांबला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सूरज सावंत

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं कळतंय. कारण, हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: कडील असलेल्या खात्यांचं तात्पुरतं वाटप केलं आहे. मंत्रीमंडळातील पूर्वीच्याच मंत्र्यांकडे शिंदेंनी त्यांच्याकडील असलेल्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लांबला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणेज, हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) दुसरा टप्पा पार पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र केंद्र सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला लाल सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची खात्रीदायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नशीबी प्रतीक्षाच कायम असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील कामकाज सोपं जाण्यासाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्पुरती सोय केली आहे. स्वत: कडील असलेल्या अतिरिक्त खात्याची तात्पुरती जबाबदारी त्यांनी आधीच्या मंत्र्यांकडे दिली आहेत. सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह 20 मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा कारभार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Viral : पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान राडा, VIDEO व्हायरल

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

SCROLL FOR NEXT