Gujarat : भाजप 'या' तारखेला सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; भूपेंद्र पटेल 20 कॅबिनेट मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

भूपेंद्र पटेल हे २० कॅबिनेट मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता
Gujarat News
Gujarat NewsSaam Tv

CM OF Gujarat : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५८ जागा जिंकल्या. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला. काँग्रेसला फक्त १६ जागांवर विजय मिळवता आला. 

Gujarat News
Beed Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; बीडमधील संतापजनक घटना

गुजरातमध्ये भाजपला १५८ जागांवर बहुमत मिळाल्यानंतर १२ डिसेंबर रोजी भाजप राज्यात सातव्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल हे २० कॅबिनेट मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी शुक्रवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, हर्ष सांघवी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हृषिकेश पटेल आणि गुजरातचे चीफ व्हिप पंकज देसाई राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज शनिवारी, भाजप आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक कमलम, गांधीनगर येथील प्रदेशच्या भाजप कार्यालयात घेणार आहे, त्यानंतर सर्व नेते दुपारी 2 वाजता राज्यपालांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहे.

Gujarat News
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना दिलासा नाहीच; पेट्रोल-डिझेलचे नवीन दर तपासा

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा शपथविधीला उपस्थित राहणार

येत्या 12 डिसेंबरला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, त्याच दिवशी 20 कॅबिनेट मंत्रीही शपथ घेऊ शकतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com