uddhav Thackeray (File Photo)
uddhav Thackeray (File Photo) saam tv
मुंबई/पुणे

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणारे खर्च करत नाहीत का? शिंदे गटाचा विरोधकांना सवाल

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या संपूर्ण राजकीय इतिहासात मुंबईत पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होणार आहे. दसरा (Dasara) मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाने चक्क शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये रोख भरले आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये रोख भरले आहेत. त्यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नरेश म्हस्के म्हणाले, 'बीकेसी मैदानावरील तयारी पूर्ण झाली आहे. तीन ते साडेतीन लाख शिवसैनिक हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी येथे येणार आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होतो, त्या मैदानाची क्षमता जास्तीत जास्त ४० हजार आहे.

दरम्यान, शिंदे गटाने एसटी महामंडळाला १० कोटी रुपये रोख देण्यावरून टीका केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना म्हस्के म्हणाले, 'लोक येत आहेत म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणारे खर्च करत नाहीत का? लोकांना जेवण दिले तर काय काय वाईट केले. मातोश्रीवर केवळ इनकमिंग आहे. आऊटगोईंग नाही. हिंदुत्वाचे विचार ऐकणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी असे भव्यदिव्य बीकेसी मैदान असायला हवं. येत्या काळात अधिक गर्दी वाढेल असा विश्वास आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | बारामतीत सुप्रिया सुळेंची गांधीगिरी! सुळेंनी गाठलं थेट अजितदादांचं घर

Special Report : मेरे पास माॅं है! अजित पवार सख्या भावाला असं का बोलले?

Superfood for Kids: रिकाम्या पोटी लहान मुलांना 'या' गोष्टी खायला दिल्यास बुद्धी होईल तल्लख

Live Breaking News: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT