Sheetal Mhatre Prakash Surve
Sheetal Mhatre Prakash Surve  Saamtv
मुंबई/पुणे

Prakash Surve: 'त्या' व्हायरल व्हिडिओ प्रकरणात प्रकाश सुर्वेंच्या मुलाची पोलिसात धाव; अटक केलेल्या तिघांवर अब्रूनुकसानीचा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: शिवसेना (Shivsena) पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला होता. (Latest Marathi News)

शितल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. आता या व्हिडिओ विरोधात प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेनेही पोलिसात धाव घेत या तिघांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोर्फ व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज सुर्वे यांनी या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात कलम 500,34 भादवि सह कलम 67(अ),67 माहिती तंत्रज्ञान अधिकार 2000 अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या व्हिडिओच्या विषयावर काल झालेल्या पत्रकार परिषदेत शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आली त्यामुळेच मला सोशल मीडियावरुन ट्रोल केले जात असल्याचे सांगत मातोश्रीवरुन हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT