Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar NCP News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाव प्लान; 'शरद मित्र' नावाने 5 लाख कार्यकर्ते जोडण्याचा निर्धार

Political News : राष्ट्रवादी वाढवण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी कोणाची कार्यकर्ते कोणाचे आणि पदाधिकारी कोणाचे यावरून अजूनही राजकारण सुरू आहे.

बरेच आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले तर काही आमदार अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहेत. पुणे शहराचा विचार करायचा तर पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवारांसोबत आहेत. त्यानंतर त्यांनी शहर कार्यालयात असलेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटोही काढला होता.  (Latest Marathi News)

राष्ट्रवादी वाढवण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. पवार साहेबांच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. शरद मित्र महाअभियान पुणे शहरात राबवले जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नवीन अभियान सुरु करण्यात आलं आहे. (Maharashtra News)

शरद मित्र नावाने सदस्य नोंदणी सुरू केली जाणार आहे. कोथरूड येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार अभियानाला झाली आहे. सदस्य नोंदणीचा शुभारंभ, शहराध्यक्ष प्रशांत जगताप याच्या हस्ते झाले आहे. (Political News)

जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे अभियान सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरात जवळपास १०० चौकात हे अभियान राबवलं जाणार आहे. ५ लाख नवे सदस्य जोडण्याचा पवार गटाचा निर्धार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

Maharashtra Politics: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी आणखी एका मंत्र्याचे अधिकार काढून घेतले, राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

SCROLL FOR NEXT