Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

भाजपने पोट निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझी मागणी नव्हती...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमधून भाजपने त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज माघारी घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने माघार घेतली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज परत घेण्याची घोषणा केली. भाजपने या निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पार्टीने ऐकलं ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. (Andheri Assembly by-election)

दरम्यान, या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी वाय बी चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी बोलताना पवार म्हणाले, एक जरी अपक्ष राहिला तर निवडणूक होईल. माझी मागणी नव्हती तर सल्ला होता. कोणाच्याही सांगण्याने झालं असेल तरी माझी हरकत नाही, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पत्रावर देखील प्रतिक्रिया दिली.

पाहा व्हिडीओ -

पवार पुढे म्हणाले, जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तर अशा प्रकारे आपण पोटनिवडणुक बिनविरोध करतोच. मात्र, हे असे निर्णय पटकन होत नसतात त्याला वेळ हा लागतोच. MCA असुदे किंवा अन्य निवडणूक असुदे, मी अनेक वर्ष राजकारणात आहे आणि मी तर तिथे उभा नाही. आता जे अर्ज बाकी आहेत ते कोण आहेत हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे पुन्हा आवाहन करणार नाही असंही पवार म्हणाले.

तर ग्रामपंचायत निवडणूक या चिन्ह आणि पक्षाच्या नावाने होत नाहीत. त्यामुळे याला काही अर्थ नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमधून चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. दरम्यान, आत्ताच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना पवार म्हणाले, काँग्रेसमध्ये (Congress) आता गांधी परिवार व्यतिरिक्त निवडणूक होतेय ही चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा निवडणूक लढलो होतो पण मी हरलो. मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) संघटना दृष्टीने चांगला व्यक्ती आहे. अर्थात तो काँग्रेस चा प्रश्न आहे असंही पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

SCROLL FOR NEXT