Sharad PAwar-Prafull Patel Saam TV
मुंबई/पुणे

Prafull Patel To Sharad Pawar : शरद पवार यांचा कारवाईचा निर्णय आम्हाला लागू नाही, प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले

Political News : कारण मोठ्या प्रमाणात पक्षातील लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर कारवाई करत अध्यक्ष  शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईवर प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांचा निर्णय आम्हाला लागू नाही. कारण मोठ्या प्रमाणात पक्षातील लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. मात्र यातून कोणताही वाद व्हावा अशी आमची इच्छा नाही. पक्ष कुणाचा आणि पक्षाचे अधिकार कुणाकडे याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.

आमच्याकडे आमदार नसते तर काल शपथ झाली नसती. आमची शरद पवारांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा मान्य करावी, असं आवाहनही प्रफुल्ल पटेल यांनी केलं. (Latest Marathi News)

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश देत आहे.

सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT