Maharashtra Politics: अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, जयंत पाटलांना केलं पदमुक्त

अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, जयंत पाटलांना केलं पदमुक्त
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पाडत बंडखोरी करणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने जयंत पाटील (Jayant Patil) यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याची घोषणा केली आहे. तसेच सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली आहे.

Maharashtra Politics
Solapur News: सोलापूरला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा, राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

एका आयोजित पत्रकार परिषदेत पटेल यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले आहेत की, ''पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत.''

Maharashtra Politics
Nitin Gadkari In Khupte Tithe Gupte: ‘शरद पवार कधीच स्पष्ट बोलत नाहीत...’ नितीन गडकरींच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय?

बहुसंख्य आमदार आमच्या सोबत : अजित पवार

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ''विरोधी पक्ष नेता नेमण्याच काम विधानसभा अध्यक्ष यांचं असतं. जास्त सख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता हे पद मिळतं. मात्र आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत.''

ते म्हणाले, ''महाराष्ट्राचा भल्यासाठी काम करत राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय. त्यांच्या पाठीशी उभ राहून राज्याच्या हितासाठी काम करणार. केंद्रात राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com