Sharad Pawar News Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: टीम इंडियाला 'कॅप्टन कूल' धोनी कसा मिळाला? शरद पवारांनी सचिनच्या समोरच सांगितली 'इनसाईड स्टोरी'

Sharad Pawar: शरद पवार यांनी टीम इंडियाला 'कॅप्टन कूल' धोनी कसा मिळाला? याबाबतची 'इनसाईड स्टोरी' सचिन तेंडुलकरच्या समोरच सांगितली.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे

Sharad Pawar News:

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यातं आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सजिव जय शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी टीम इंडियाला 'कॅप्टन कूल' धोनी कसा मिळाला? याबाबतची 'इनसाईड स्टोरी' सचिन तेंडुलकरच्या समोरच सांगितली. (Latest Marathi News)

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थितांशी बोलताना क्रिकेटच्या इतिहासाला उजाळाला दिला. 'अनेक वर्षे आपल्या खेळाचं कर्तृत्व गाजवलं. आपल्या निवृत्तीची मॅच सुद्धा या मैदानात खेळली. आता त्याच मैदानात पुतळा उभारला गेला आहे. असं क्वचितचं लाभतं, ते सचिन तेंडुलकरला लाभलं, असं शरद पवार म्हणाले.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाच्या कर्णधारपदाविषयी भाष्य करताना शरद पवारांनी सचिन आणि इतर दिग्गज राजकीय नेत्यांसमोर 'इनसाईड स्टोरी' सांगितली. 'एकदा मी दिल्लीत असताना मला ग्राउंडवर फेरफटका मारून येऊ असं सांगितलं. त्यावेळी नवीन पिढी तिथे खेळत होती. तेव्हा मला सांगितलं की, हा मुलगा देशाचं नाव रोशन करणार....ते नाव सचिन तेंडुलकर, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'सचिनच्या पुतळ्यामुळे प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा हा सन्मान होतो, तो कधी डोक्यात जाऊ दिला नाही. मी एकदा बसलो होतो. तेव्हा मला सांगितलं की सचिनला कर्णधारपद घ्यायला सांगा. तेव्हा मी म्हटलं की, तो निर्णय घेऊ शकत नाही. मी प्रशासक आहे. काही दिवसानंतर लंडनला गेलो होतो, तेव्हा सचिनला कर्णधारपदाबाबत विचारलं. तेव्हा त्याने एमएस धोनीचं नाव सुचवलं, असे ते म्हणाले.

'आता एक प्रोजेक्ट बाकी राहिला आहे. तो म्हणजे 'म्युझियम'. त्या म्युझियममध्ये सचिनविषयी सर्व माहिती ठेवा. सचिनशिवाय वानखेडे पूर्ण होऊ शकत नाही,अशी इच्छा देखील शरद पवार यांनी व्यक्त केली.

सचिनने व्यक्त केल्या भावना

सचिन म्हणाला, 83 सालचा विश्वचषक भारतानं जिंकला, तेव्हा मी फार लहान होतो. मात्र, तेव्हापासून विश्नचषकाचं स्वप्न बाळगलं होतं . ते स्वप्न या मैदानावर पूर्ण झालं. त्यावेळी अनेक आव्हाने आली. शालेय क्रिकेट, शिवाजी पार्क, आझाद मैदान इथं खूप क्रिकेट खेळलो. सुनील गावस्करांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा 14 वर्षांचा होतो.

'माझ्या हिरोला प्रत्यक्षात ड्रेसिंग रूममध्ये पाहून भारावून गेलो होतो. मुंबईसाठी क्रिकेट खेळताना फार मजा आली. इथं, वानखेडेवर जेव्हा कधीही अवेळी सराव करण्याची इच्छा व्यक्त केली, ग्राऊंड स्टाफ आणि पदाधिकारी यांनी कधीही नाही म्हटलं नाही. त्यांचा हाच पाठिंबा इथपर्यंत घेऊन आला, असे तो पुढे म्हणाला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT