Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : झेड प्लस सुरक्षा मिळाल्याने शरद पवार हैराण, उपस्थित केली शंका

Z Plus security : शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी आता ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. शरद पवार यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यावरुन सवाल जवाब सुरु आहेत.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Z Plus security : शरद पवार यांना केंद्र सरकारकडून नुकतीच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी (Sharad Pawar Z Plus security) आता ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. शरद पवार यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यावरुन सवाल जवाब सुरु आहेत. शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दौऱ्यासंदर्भात माहिती काढून घेण्यासाठी सुरक्षा पुरवली असल्याची शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच देशातील तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याचं मला सांगितलं. मी त्यांना इतर दोन व्यक्ती कोण आहेत? असं विचारल्यानंतर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नावं सांगितली. मला कशासाठी सुरक्षा पुरवली, हे माहिती नाही. कदाचीत निवडणुका असल्यामुळे सगळीकडे फिरावं लागते, त्यामुळे योग्य अचूक माहिती मिळवण्याची व्यवस्था केली असावी, असे शरद पवार म्हणाले.

मी त्यांना कुणाकडून काही धमकी आलीय का वगैरे विचारलं. पण त्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती नव्हती. ते सांगू शकले नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

बदलापूर प्रकरणावर शरद पवार काय म्हणाले ?

बदलापूर प्रकरण झालं,अत्याचार होतो धक्का देणारी घटना आहे, याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटली. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे कडक,राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे. आंदोलन झालं ते बदलापूर पुरते ते नव्हतं तर अनेक गोष्टी होत आहेत. मुली अत्याचार, बालिका अत्याचार होत आहे, या घटना वाढत आहेत. लोकांच्या रागाचा उद्रेक आहे, संघर्ष भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नांची अस्था असलेला प्रत्येक घटक महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावा. तीव्र भावना व्यक्त कराव्यात. महाराष्ट्रातील जनतेनं मुलींसाठी एकत्रित येत भावना व्यक्त कराव्यात.

आम्ही काही कोणी बदलापूरला गेलो नाही, पण असा प्रकार झाल्यानंतर यात राजकारण आहे, अश म्हणण योग्य नाही. हे राजकीय कसं असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं म्हणायला नको होतं. राजकारण कोणी आणला नाही, असे शरद पवार म्हणाले.

या घटना वाढत आहेत थांबत नाहीत. कायदा सुव्यवस्था यत्रणा जागरूक करावी लागेल. कोणाला दोष देत नाही,सगळ्यांनी शांततेत काम करावं. पोलिस दलाने अधिक संवेदनशील काम केलं पाहिजे, परत गुन्हे दाखल करण योग्य नाही. गृहखाते यांनी संवेदनशील व्हावे, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT