Sharad Pawar News : शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर; आता महाआघाडीतून कोणता नवा चेहरा?

Sharad Pawar PM Post Race Latest Update : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाने विरोधी पक्षांमध्ये तेजीची लाट आलीय.
Sharad Pawar Narendra Modi
Sharad Pawar Narendra ModiSaam TV

Sharad Pawar PM Post Race Latest Update : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाने विरोधी पक्षांमध्ये तेजीची लाट आलीय. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी 'वज्रमूठ' आवळली आहे. एकजुटीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

नितीश कुमार यांनी 'मिशन' सुरूही केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसोबत आढावा बैठक झाली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? नितीश कुमार २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  (Latest Marathi News)

'पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी सांगितले की, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत आहे. देशाच्या भल्यासाठी काम करणारे नेतृत्व विरोधी पक्षांना हवा आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असेच प्रयत्न करत आहेत. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Narendra Modi
Jayant Patil News | Sharad pawar यांच्या भेटीला जयंत पाटील! NCP मध्ये मोठी गटबाजी उघड?

नितीशकुमार यांच्यासाठी संधी?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते निवडणूक लढवतील किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. दुसरीकडे नालंदा लोकसभा मतदारसंघातून जेडीएसचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी नितीश कुमार यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, याबाबत मी सध्या तरी काहीच बोलू इच्छित नाही, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Narendra Modi
Maharashtra Politics: कर्नाटक निवडणूक निकालानंतर शरद पवार मैदानात! महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली

नितीश कुमार यांचे नाव उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघांशी जोडले गेले होते. त्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा होती. पण त्यांनी स्वतःच हे वृत्त फेटाळले होते. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले होते.

शरद पवार यांच्या आधीच नितीश कुमार यांनीही आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे. पण लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार यांच्याप्रमाणे नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशावेळी नितीश कुमार यांच्यासाठी मोठी संधी मानली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com