Sakshi Sunil Jadhav
अवघड गोष्टी सोप्या करून आज कामे करावी लागतील. परिस्थितीशी दोन हात करावे लागेल.
आपली रसिकता वाढीस लागेल. जोडीदाराबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
बोलून समोरच्याला आपलेसे कराल. आपले कोण आणि परके कोण हे ओळखून आज वागणे गरजेचे आहे. तब्येत जपावी.
भावनिकता असणं हे एका बाजूने चांगले आहे तरी पण त्याचे दुसरी वाईट बाजू सुद्धा आहे. विशेष विष्णू उपासना करा.
कधी कधी इतरांचे करण्यासाठीच आपला जन्म आहे असे भावना आपल्याला होते. कुटुंबातील व्यक्तींना भक्कम आधार देण्याचे काम आज तुम्ही कराल.
हुशारीने वागणे हे आपल्यासाठी अगदीच सोपे आहे. भावंड सौख्य उत्तम राहील.
लक्ष्मीची कृपा आज आपल्यावर विशेष राहणार आहे.आपली चर असणारी रास आज फिरती, भ्रमंती मधून धनयोग संभवतो आहे.
एकादशीची सात्विकता आज आपल्यामध्ये रुजेल. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून वेगाने पुढे जाल.
मोठ्या प्रवासाचे योग आहेत. नियोजित बैठका पार पडतील. पण शक्यतो दुपारनंतर आयोजित केल्या तर बरे राहील.
एकलकोंडा स्वभावामुळे आपल्याच कोशात आज राहण्याचा योग आहे. अवलोकनांमधून नवीन काही गोष्टी शिकाल.
संशोधनात्मक कार्य आपल्याला करायला आवडते. सामाजिक कार्यात, राजकारणामध्ये आज आपला वावरसुद्धा राहील.
आज एकादशी निमित्त विशेष उपासना करणे आपल्या राशीला फायदेशीर ठरेल. प्रेमामध्ये उत्तम यश मिळेल.