Sharad Pawar at Baramati  SAAM TV
मुंबई/पुणे

Video : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? शरद पवार म्हणाले, ...ते मी बघून घेतो!

Sharad Pawar Latest News : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल शरद पवार यांनी फुंकलेले दिसतंय.

Nandkumar Joshi

अक्षय बडवे, पुणे | साम टीव्ही

दोन्ही सरकार आज आमच्या हातात नाहीत. पण लोकसभा निवडणुकीत जसं काम झालं, तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही ते मी बघून घेतो, असे शरद पवार म्हणाले. लोकसभेला जे योग्य होतं, ते तुम्ही केलं. विधानसभेलाही जे योग्य आहे ते करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकल्या. या यशानं शरद पवार गटाचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. पक्षनेतृत्वानं लागलीच आगामी विधानसभा निवडणुकीचीही तयारी केल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार थेट दुष्काळी दौऱ्यावर निघाले असून, गेल्या काही दिवसांपासून केलेल्या त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांसाठी मोठा प्लान केला आहे की काय? अशी चर्चा सुरू आहे.

शरद पवार दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज, बुधवारी बारामतीमधील निरा वागज गावात आले. दौऱ्यातील हे तिसरे गाव आहे. त्यांचं या गावात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिलं. त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळं शक्य झालं, अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे आभार मानले. आता विधानसभा निवडणुकीचाही विचार करावा लागेल. राज्य हाती घ्यायचं असेल तर, पुढील दोन-तीन महिने काम करावं लागेल, असंही ते म्हणाले.

सत्ता येते, सत्ता जातेही!

शरद पवार यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानून कौतुकही केले. ते म्हणाले की, सत्ता येते, तशी जातेही. आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोक आठवण ठेवतात. काही तात्पुरते यशस्वी ठरतात. मी नेहमी सांगतो की देशात लोकशाहीचं राज्य आहे.

या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते, कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसतही नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली, तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी यावेळी दिली.

मी बघून घेतो...

आजच्या घडीला दोन्ही सरकारे आमच्या हातात नाहीत. कालच्या निवडणुकीत जसं काम झाले आहे, तसं केलं तर राज्य सरकार कसे आपल्या हातात येत नाही ते मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते केलं. आता विधानसभेलाही योग्य आहे तेच करा, असंही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT