Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: दंगली घडविण्याऱ्या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती; शरद पवारांचा गंभीर आरोप

राज्यातील हिंसाचाराच्या घटनांमागे नेमका कोणाचा हात आहे, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य करत गंभीर आरोप केला आहे.

दिलीप कांबळे

sharad Pawar News: राज्यातील अनेक भागात दोन गटातील वाद विकोपाला जाऊ लागले आहेत. दोन गटातील हिंसेच्या घटना कोल्हापूर, नगर, अकोला या भागात गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. दोन गटात झालेल्या या हिंसेच्या घटनांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनांमागे नेमका कोणाचा हात आहे, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य करत गंभीर आरोप केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. काल शरद पवार यांनी लोणावळा येथे हजेरी लावली. लोणावळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेच्या समारोपासाठी शरद पवार हे लोणावळ्यात आले होते. या कार्यशाळेत शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी शरद पवारांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.

शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, 'राजकीय लोकांनी संघटित राहायला हवं. कारण सध्या धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केलं जातंय. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे. या गोष्टी देशाच्या बाबतीत गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होतायेत, असं म्हणत शरद पवार यांनी या सर्व दंगलीची तारखेनुसार मांडणी केली.

सध्या देशात दहशतीचं वातावरण- शरद पवार

शरद पवार पुढे म्हणाले, 'हा देश हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे .मात्र, सध्या दहशतीचे वातावरण निर्माण केली जाती आहे. या कामाची पद्धत दिसून येत आहे'. शरद पवारांच्या गंभीर आरोपानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT