Sharad Pawar News: पुण्यात दिवसेंदिवस कोयता गँगचा उच्छाद वाढत चालला आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. 'कोयता गँग या राज्य सरकारची देणगी आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)
शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील कोयता गँगवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ' कोयता गँग हे मी इतक्या वर्षात ऐकलेलं नव्हतं. ज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महिलांवरील हल्ले, कोयता गँग या राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही.'.
बुलढाण्यातील भीषण अपघातावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने अपघात होताहेत, हे गेले काही महिने बघायला मिळत आहे. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात'.
'जो अपघातात मृत्यू पावतो, तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात. त्याचे कारण रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, तो तयार केला, त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले, असे शरद पवार म्हणाले.
'५ लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी.रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.