Sharad Pawar On PM Narendra Modi and Opposition Meeting Latest Update SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News : विरोधकांच्या बैठकीचं ठिकाण बदललं; शरद पवारांनी तारीख सांगितली, मोदींवरही निशाणा

Sharad Pawar On PM Narendra Modi : पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे अस्वस्थ झाले आहेत, असंही पवार म्हणाले.

Prachee kulkarni

Opposition Meeting Venue : बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक झाल्यानंतर दुसरी बैठक शिमला येथे होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांची दुसरी बैठक ही बेंगळुरूत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, गुरुवारी दिली. ही बैठक १३ आणि १४ जुलै रोजी होईल.

केंद्रातील भाजप ( BJP News ) सरकारविरोधात देशातील जवळपास १५ विरोधी पक्ष एकवटले होते. बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक झाली होती. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांची एकजूट दिसून आली. (Marathi Tajya Batmya)

शरद पवार यांनी केली घोषणा

विरोधी पक्षांच्या नेत्यांची (Opposition Meeting Update) पुढील बैठक ही १३ आणि १४ जुलैला बेंगळुरूत होईल, असे शरद पवार यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींवरही निशाणा साधला. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे अस्वस्थ झाले आहेत, असंही पवार म्हणाले.

विरोधी पक्षांच्या बैठकीला ३२ नेत्यांची उपस्थिती

पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीला विविध पक्षांचे जवळपास ३२ नेते सहभागी झाले होते. मायावती, नवीन पटनाइक, के चंद्रशेखर राव, वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. तर आरजेडीचे नेते जयंत चौधरी हे पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT