Sharad Pawar-Dilip Walse Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: '२५ वर्ष मंत्री तरी विकास नाही, आता उत्तर शोधावं लागेल', शरद पवारांचे 'वळसे पाटलांना' थेट आव्हान!

NCP Chief Sharad Pawar Press Conference Ambegaon: आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे. आता राज्य हात घ्यायचे आहे," असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेची तुतारी फुंकली आहे.

रोहिदास गाडगेखेड

जुन्नर, ता. २० जुलै २०२४

"शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. जशी लोकसभा लढलो तशी विधानसभा लढायची आणि राज्य हातात घ्यायचे," असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकींची तुतारी फुंकली आहे. आज शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जुन्नर, आंबेगाव भागाचा दौरा केला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

मोदी- शहांवर टीकास्त्र

"या सरकारने ठराविक लोकांसाठी सत्ता वापरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदलेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत," असे महत्वाचे विधान शरद पवार यांनी केलं.

जागा वाटपावरुन महत्वाचे विधान!

"शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. मविआ चे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हीच जागा द्या किंवा तीच जागा द्या, असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे. आता राज्य हात घ्यायचे आहे," असंही शरद पवार म्हणाले.

वळसे पाटलांवर निशाणा

"दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा. मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT