शरद पवार गडकरींना म्हणाले केंद्र सरकारमधील सहकार क्षेत्रातील तारणहार
शरद पवार गडकरींना म्हणाले केंद्र सरकारमधील सहकार क्षेत्रातील तारणहार Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवार गडकरींना म्हणाले केंद्र सरकारमधील सहकार क्षेत्रातील तारणहार

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: केंद्र सरकारमध्ये संपूर्ण सहकार विभागाचे तारणहार म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते इथे उपस्थित असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. सध्या सहकार मंत्री अमित शहा आहेत. मात्र शरद पवार यांनी चक्क गडकरींचा उल्लेख केंद्र सरकारमधील सहकार क्षेत्रातील तारणहार असा केलाय. गडकरींना सहकार क्षेत्राबद्दल आस्था आहे. खूप वेळा  ते याबाबत ते परखडपणे बोलतात असे म्हणत केंद्र सरकारमध्ये संपूर्ण सहकार विभागाचे तारणहार म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते इथे उपस्थित असल्याचे पवार म्हणालेत.

राज्य सहकारी बँकेला 110 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने पवार बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्ष पूर्ण होत असून, त्या निमित्तानं शतकोत्तर दशपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे , मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे यांच्यासह राज्यातील इतर मंत्री उपस्थित होते.

काय म्हणाले नेमकं पवार

सहकार क्षेत्रात महत्त्वाचे काम करणारी संस्था म्हणून आपण या बँकेला ओळखत असतो. ग्रामीण आणि नागरी क्षेत्रातील सहकार क्षेत्रात हातभार या बँकेचा लागला राज्य सरकार आणि राज्य सहकारी बँकेत नेहमीच समन्वय असायचे तसेच नेहमीच या बँकेचे सहकार्य राहिले आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत असे पवार म्हणाले. ही बँक समृद्ध होणं म्हणजे महाराष्ट्रातील सहकार समृद्ध होणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

SCROLL FOR NEXT