Sharad Pawar saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: 'कोण काय करतंय? हे मला व्यवस्थित दिसतं', शरद पवारांची तुफान फटकेबाजी

Sharad Pawar: डॉक्टर म्हणाले तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही.

मंगेश कचरे

Sharad Pawar: इंदापूर शहरातील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतंय, त्यामुळे कोण काय करतंय हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही.

या कार्यक्रमात भाषण करताना पवार म्हणाले, काही महिन्यांपूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांना दिसण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं आत्ताच करून टाका.

पण डॉक्टर म्हणाले की एकदम तुमच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे. पवारांच्या या शाब्दिक कोटीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. (Latest Marathi News)

पुढे बोलताना पवार म्हणाले, डॉक्टरांनी सांगितले की पाळीपाळीने आम्ही तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करू. आता एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले. त्यांनी डोळ्यात नक्की काय बसवलं हे मला माहित नाही. परंतु मला आता सर्वकाही व्यवस्थित दिसतं, त्यामुळे कोण काय करतं हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही. पवारांच्या या वाक्यानतंर पुन्हा एकदा कार्यक्रमात जोरदार हशा पिकला. (Latest Political news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT