Maharashtra Politics MVA Seate  the Quint
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत शरद पवारच 'चाणक्य'; सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News : ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास विकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवारच चाणक्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र पवारांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. पवारांनी किंगमेकरची भूमिकेतून महाविकास आघाडीत 85-85-85 जागांचा प्रस्ताव ठाकरे आणि काँग्रेसच्या गळी उतरवला. यानंतर पवारांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी नवी रणनीती आखलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत पवारच चाणक्य असल्याची चर्चा रंगलीय. मात्र पवार महाविकास आघाडीचे चाणक्य असल्याचं का म्हटलं जातंय? पाहूयात.

आघाडीचे चाणक्य 'पवार'?

ठाकरे आणि काँग्रेस या विरोधी विचारधारांना एकत्र करत मविआची पायाभरणी

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून भाजपला धक्का

लोकसभेला कमी जागा लढवूनही सर्वाधिक स्ट्राईकरेटचा करिष्मा

मविआत ठाकरे गट आणि काँग्रेस इतक्याच जागा मिळवण्यात यश

काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद मिटवण्यात महत्वाची भूमिका

पवारांकडून धोक्याच्या जागांची आदलाबदल करत जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा मिळवल्या

उमेदवारांची निवड आणि प्रचारावर पवारांचं विशेष लक्ष

सर्वाधिक जागा जिंकून पवारांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची शक्यता

लोकसभेतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद आणि जागा वाटपावर लक्ष केंद्रित केलं. मात्र पवारांनी जिंकण्याची क्षमता असलेले भाजप आणि अजित पवारांच्या नाराज नेत्यांना गळाला लावून आपला स्ट्राईकरेट वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं.

तर दुसरीकडे जागा वाटपात मेरिटचं कारण देत पवारांनी राजकीय सौदेबाजीत आघाडी घेतली. तर काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद झाल्यानंतर पवारांनी मध्यस्थीची भुमिका घेतली. मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरु असताना पवारांनी मुख्यमंत्रिपद हे निकालानंतरच ठरवण्यात येईल, अशी स्पष्ट भुमिका घेतली. त्यामुळे सर्वाधिक स्ट्राईकरेटसह पवारांचा पक्ष मुख्यमंत्रिपद राखण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT