Sharad Pawar, NCP Meeting Today SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News : राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय, शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar, NCP Meeting Today : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

Rashmi Puranik

Sharad Pawar, NCP Meeting Today : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायची असा निर्णय यावेळी घेण्यात आला. (Latest Marathi News)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट कौल दिला. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख घटकपक्षांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्यावर चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. दरम्यान ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनवर आहे, त्याची जबाबदारी विभागवार नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी भक्कम ठेवा- पवार

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार

जे तीन वर्षांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर आहेत, त्यांना बदलण्यात येणार

विभागवार शिबिरे घेण्यात येणार, तिथे राज्यातील प्रश्नांवरच चर्चा होणार

राष्ट्रवादीची १० जून रोजी मोठी सभा होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT