Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Health Update: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?

Sharad Pawar Latest News Today : शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. छातीचा संसर्ग आणि खोकल्यावरील उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते सिल्व्हर ओक्स निवासस्थानी परतले आहेत.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Discharged Mumbai’s Breach Candy Hospital : शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. छातीत संसर्ग आणि खोकल्याचा त्रास जाणवल्यानं त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट मुंबईतील त्यांच्या 'सिल्व्हर ओक्स' या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

शरद पवार यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी छातीत संसर्ग (Chest Infection) आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर झाली आहे. त्यांच्या सर्व चाचण्या आणि आरोग्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर ते आपल्या 'सिल्व्हर ओक्स' या निवासस्थानी सुखरूप पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block : ऐन सणासुदीत प्रवाशांचे मेगा हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Ventilator 2: १० वर्षांनंतर कामेरकर कुटुंब पुन्हा एकत्र येणार; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'व्हेंटिलेटर'च्या सिक्वेलची घोषणा!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधीपासून सुरू होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

अभ्यंगस्नान करताना सर्वात आधी तेल लावावे की उटणे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT