Rahit Pawar ED Inquiry Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: रोहित पवार यांची तब्बल 8 तास चौकशी, ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Rahit Pawar ED Inquiry: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची तब्बल आठ तास ईडी चौकशी करण्यात आली आहे. रोहित पवार पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Satish Kengar

Rahit Pawar ED Inquiry:

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची तब्बल आठ तास ईडी चौकशी करण्यात आली आहे. रोहित पवार पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच ईडी चौकशीविरोधात शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी प्रदेश कार्यालयाबाहेर उपोषण बसले होते. रोहित पवार चौकशीनंतर ईडी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं आहे.

याआधी 24 जानेवारी रोजी बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात त्याची ११ तास चौकशी करण्यात आली होती. आज ईडी चौकशी झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, ''लोकशाहीचा आवाज दाबला जातोय.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवार म्हणाले, आज दुसऱ्यांदा मला चौकशीसाठी बोलावलं होते. मला जे कागद पत्र मागितली होती, ते सर्व मी दिले. मला बरेच प्रश्न विचारण्यात आले त्याला उत्तर देण्याचे काम मी केले. (Latest Marathi News)

ते म्हणाले, काही नवीन प्रश्न आले. 8 तारीख मला कागद पत्र मागितले आहेत ते देणार आहे. मी कारखाना घेण्यापूर्वी जे डायरेक्ट होते, त्या बद्दल काही जणांनी आक्षेप घेण्यात आले. एक याचिका करण्यात आली त्यात माझे नाव कुठेच नव्हते. EOW या प्रकरणी दोनदा चौकशी केली. त्यांनी सखोल चौकशी केली. EOW ने त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिला.

रोहित पवार पुढे म्हणाले, ''मुंबईत एक सोन्याचा हंडा लपला आहे, ते शोधण्यासाठी जी धडपड होती, तशी चौकशी सुरु आहे. धडपड करून कुठे तरी चूक कढण्याचा प्रयत्न करत आहेत.'' पवार म्हणाले, येत्या काळात काय होईल, सांगता येत नाही. पण मी काहीच केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भायखळा येथे तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Pune Crime: पुणे हादरले! शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, प्रॉपर्टीसाठी आजोबानेच नातवाला संपवलं

Sleeping : ८ तासांची पुरेपूर झोप काढली, पण तरीही थकल्यासारखं वाटतं; असू शकतात 'ही' ५ गंभीर कारणे

Sanjay Raut : संजय राऊत यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील मोर्चात आली भोवळ

High blood pressure: सकाळी सकाळी या 6 पैकी 1 ड्रिंक नक्की ट्राय करा, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT