Sharad Pawar News, Political news Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : नवं सरकार सत्तेत येताच शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 10 दिवसांच्या राजकीय घडमोडीनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार आलं. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून बाहेर पडताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. माहितीनुसार, ही नोटीस जुन्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

महाविकास आघाडीचं सरकार कोसळताच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

दरम्यान, पत्रकारपरिषदेत शरद पवार यांना नोटीशीबाबत विचारलं असता, "मला आयकर खात्याने प्रेमपत्र पाठवले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये मी निवडणुकांना उभे राहताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या अनुषंगाने मला ईडीने सगळ्या वर्षांसाठीच्या नोटीस आता एकत्र पाठवल्या आहेत. सुदैवाने या सगळ्याची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही", असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'तपास यंत्रणांचा गैरवापर'

शरद पवार यांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे. "आजकाल ईडी आणि केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जात आहे आणि त्याचे परिणाम देखील समोर येत आहेत. त्यांना चौकशीच्या नोटिसा मिळाल्याचे विधानसभेतील अनेक सदस्यांचे असे म्हणणे आहे. तर ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. पाच वर्षांपूर्वी आम्हाला ईडीचे नावही माहिती नव्हते. आज खेड्यापाड्यात लोक गंमतीने म्हणतात की ईडी तुमच्या मागे लागली असेल". असं पवारांनी म्हटलं आहे.

पवार पुढे म्हणाले की, "या प्रणालीचा वापर वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या लोकांसाठी केला जातो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'मला आयकर कडूनही असेच प्रेमपत्र मिळाले आहे. ते आता 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात असलेल्या माहितीची छाननी देखील करत आहेत. त्यामुळे मला कसल्याही प्रकारची माहिती देण्याची चिंता नाहीये". असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT