sharad pawar gave advice to pm modi on ukraine crisis Saam Tv
मुंबई/पुणे

Ukraine Crisis: "उद्घाटनं महत्वाची पण, मुलांची सोडवणूकही महत्वाची" - पवारांचा मोदींना सल्ला...

Sharad Pawar On Ukraine Crisis: संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको तर अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत असा सल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

साम टिव्ही

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे: रशियाने युक्रेनवरच्या (Ukraine - Russia) दोन शहरांवरचा हल्ला तात्पुरता थांबवत, युक्रेमनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसह विदेशी नागरिकांना बाहेर पडता यावं यासाठी तात्पुरती युद्धबंदी केली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय नागरिक अडकले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर टिका केली आहे. संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको तर अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत असा सल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. उद्घाटनं महत्वाची पण, मुलांची सोडवणूकही महत्वाची आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. (sharad pawar gave advice to pm modi on ukraine crisis)

हे देखील पहा -

शरद पवार म्हणाले की, पुण्याचे विद्यार्थी त्यांची चिंता साहजिक आहे. देशातले ‌अनेक विद्यार्थी अडकलेले आहेत. दूतावासाने प्रयत्न केले, काही विद्यार्थी माझ्याशी बोलले अशी माहिती पवारांनी दिली. पुढे ते म्हणाले की, मेडिकल शिक्षणासाठी भारताच्या विद्यार्थ्यांचं युक्रेनला (Ukraine) जाण्याचं प्रमाण अधिक आहे, कारण तिथं फी कमी आहे. आज हजारो विद्यार्थी तिथं जातात. मी तिथं गेलो सुंदर देश आहे. शैक्षणिक हब आहे असं पवार म्हणाले.

भारतीय दूतावासाबद्दल शरद पवारांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. भारतीय दुतावासानं विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही बाहेर या, ५-६ तास चालाव लागेल. ही बॅार्डरवर थंडी असून हल्ला होतेय अशी विद्यार्थ्यांची तक्रार असल्यां पवार म्हणाले.

त्याचप्रमाणे सत्ताधारी यांनी यात अधिक लक्ष द्यावं, मला मान्य आहे की उद्घाटनं महत्वाची पण, मुलांची सोडवणूकही महत्वाची आहे असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT