Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु; शरद पवारांनी सारं काही उलगडून सांगितलं

Sharad pawar Latest News: ईडीवर कारायावायांवर शरद पवारांनी भाष्य करत सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु, अशी टीका केली आहे.

साम टीव्ही ब्युरो

Sharad Pawar News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या कथित १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर तरुंगाबाहेर आहेत. अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडी कारायावायांवर शरद पवारांनी भाष्य करत सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची टीका केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी ईडी कारवायांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, 'अनिल देशमुख यांना १३ ते १४ महिने तुरुंगात ठेवलं. एका शैक्षणिक संस्थेसाठी १०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. सतत चौकशीनंतर आरोप जे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये १०० कोटींची रक्कम ही २० कोटी रुपयांवर आली. याचा अर्थ अतिरंजीत अशा प्रकारचे आरोप केले जातात'.

'लोकांच्या समोर सुरूवातीला १०० कोटींचे आरोप गेले. त्यामुळे लोकांना धक्का बसला होता. त्यांची बदनामी करण्याचे काम केलं”, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'अनिल देशमुखांनी शैक्षणिक संस्थेसाठी घेतलेली रक्कम अजूनही त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आहे. ती रक्कम खर्चही झालेली नाही. यावरून अनिल देशमुखांना १३ ते १४ महिने तुरुंगवास म्हणजेच सध्याचे शासन हे सत्तेचा कसा गैरवापर करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले.

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, पण महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटील यांचे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना कशासाठी बोलावलं याची कल्पना नाही. ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Maharashtra Live News Update: - वरळी कोळीवाड्यात शिंदे-ठाकरे आमनेसामने

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

SCROLL FOR NEXT