Raj Thackeray on Ajit Pawar: 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांच काय होईल', राज ठाकरेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांच काय होईल', राज ठाकरेंचं अजित पवारांवर टीकास्त्र
Raj Thackeray on Ajit Pawar
Raj Thackeray on Ajit PawarSaam Tv

Raj Thackeray In Avdhoot Gupte Show: 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांच काय होईल', अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली आहे. संगीतकार, गायक, निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये राज ठाकरे (Khupte Tithe Gupte) असं म्हणाले आहेत. राज ठाकरे यांचा हा एपिसोड रविवारी प्रसारित केला जाणार आहे.,

Raj Thackeray on Ajit Pawar
Actor Sarath Babu Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! 5 दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याचं निधन

'खुपते तिथे गुप्ते'चे हे नावीन पर्व आहे. ज्याच्या पहिल्याच भागात राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. या भागात राज ठाकरे यांची तुफान राजकीय फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

राज ठाकरेंचा दादांवर हल्ला बोल

या शोचा एक ट्रेलर समोर आला आहे. शोच्या ट्रेलरमध्ये राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका केली आहे. या ट्रेलरमध्ये अजित पवार यांच्या एक व्हिडीओची क्लिप राज ठाकरे यांना दाखवण्यात आल्याचं दिसत आहे. ज्यात अजित पवार बोलताना दिसत आहेत की, ''सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी (राज ठाकरे) निवडणुकीत 14 आमदार निवडणून आणले. ते सगळे त्यांना सोडून दूर गेले.''

Raj Thackeray on Ajit Pawar
Tata Altroz CNG: 5-स्टार सेफ्टी रेटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ; जबरदस्त मायलेजसह Tata Altroz ​​CNG भारतात लॉन्च

ही व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर राज ठाकरे बोलताना दिसत आहेत की, ''अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही.'' ते म्हणाले, ''बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांच काय होईल.''

'खुपते तिथे गुप्ते' या शोच्या नावीन पर्वाचा ट्रेलर पाहून प्रेक्षांची उत्सुकता वाढली आहे. या शोमध्ये राज ठाकरे आणखी कोणाची शाळा घेतील हे रविवारीच कळू शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com