sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : 'मी शपथ घेतो की...'; शरद पवारांनी भरपावसात कार्यकर्त्यांना दिली शपथ ; महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, VIDEO

sharad Pawar News : राज्यातील महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी महिला अत्याचाराविरोधात भरपावसात कार्यकर्त्यांना शपथ दिली.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन केलं. अत्याचाराच्या विरोधात शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी शपथ दिली.

महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' घोषणा केली होती. मात्र, हायकोर्टाने महाविकास आघाडीचा बंद बेकादेशीर ठरवला. त्यानंतर महाविकास आघाडीने निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं. यावेळी आंदोलनासाठी पुण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील पुणे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शरद पवार गटाकडून मूक आंदोलन करण्यात आलं.

शरद पवार काय म्हणाले?

या घटनेच्या निषेधार्थ भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे. राज्यकर्त्यांना जाण राहिलेली नाही. या घटनेवर त्यांना कारवाई करायची आहे. महाराष्ट्रात एक दिवस असा जात नाही, त्यात कुठे तरी भगिनीवर अत्याचार झाल्याची बातमी येत नाही. आतापर्यत जे घडले आहे, त्याची गांभिर्याने दखल सरकारने घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचे वाईट वाटते की राज्यकर्ते म्हणतात, विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत. राज्यकर्ते किती अंसवेदनशील आहे हे यातून दिसते'.

सुप्रिया सुळेंची सरकारवर आगपाखड

खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचारावरून सरकार टीका केली. पुण्यातील निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे म्हणाल्या,'आता वर्दीची भीतीच राहिलेली नाही. बदलापूर सारख्या अनेक घटना महाराष्ट्रात होत आहेत. सरकार अंसवेदनशील आहे. बदलापूर येथील आंदोलनकर्ते बाहेरचे होते, असे म्हणतात. पण ते भारतीय होते. त्यांनी आंदोलन केले तर काय चुकले. पुण्यात रक्ताचे नमुने बदलला जातात, ड्रग माफिया पळून जातो, कोयता गॅंग आहे. पुण्यात अशी एकंदरित परीस्थिती आहे. माध्यमांनी सांगितले की, आंदोलक स्थानिकच होते. म्हणजे सरकार या घटनेवर सरकार गलिच्छ राजकारण करत आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा जाहीर निषेध करते'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

Manoj Jarange News : कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे? मनोज जरांगे आज फैसला सांगणार!

Viral Video: AC ट्रेनमध्ये ही अवस्था; प्रवासी कोंबले, दरवाजाही लागेना! प्रत्येक प्रवाशाचे दुःख सांगणारा VIDEO

SCROLL FOR NEXT