Pune News:  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र; पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार-अजित पवार काय बोलणार?

Pune News: राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत.

Vishal Gangurde

Pune News:

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात आहे. दोन्ही पवार गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

पुण्यातील दौंड तालुक्यातील चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी एकत्र आले आहेत. या नव्या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या स्टेजवरील आसनव्यवस्थेचा क्रम बरचं काही सांगून जात आहे. खुर्च्यांवर कोण कुठे बसणार त्यानुसार नावांच्या पट्ट्या चिटकवण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवार काका-पुतणे या कार्यक्रमात शेजारी शेजारी बसतील असे वाटत होते. मात्र, स्टेजवर बसून ते एकमेकांना बोलतात का याची उत्सुकता होती. मात्र, दोघांच्यामध्ये प्रतिभा पवार यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. प्रतिभा पवार यांच्या उजवीकडे शरद पवार बसले आहेत. तर डावीकडे दोन खुर्च्यांचं अंतर राखून अजित पवार बसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT