Sharad Mohol Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Mohol: शरद मोहोळची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आलं समोर, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime News:

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. पुण्यात भरदुपारी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून मोहोळची हत्या केली आहे. कुख्यात गुंड मोहोळची हत्या करणाऱ्या एका आरोपीचं नाव समोर आलं आहे. (Latest Marathi News)

पुण्यात गुंड शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र,मोहोळला उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहोळवर तीन ते चार जणांकडून गोळीबार

शरद मोहोळवर दुपारी १.३० च्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा येथे तीन ते चार जणांनी गोळीबार केला. शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचे नाव समोर आलं आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. मोहोळवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

कोण आहे शरद मोहोळ ?

गुंड शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पिंटू मारणे हत्येप्रकरणी मोहोळला अटक केली होती. याच हत्या प्रकरणात तो जामिनावर होता. मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT