TDRF Jawan Death In Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Shahapur: खड्ड्याने घेतला जवानाचा जीव, भिवंडी इमारत दुर्घटनेत अनेकांचे वाचवले होते प्राण

TDRF Jawan Death In Accident: शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे जवानाचा मृत्यू झाला. कामावर निघालेल्या जवानाची दुचाकी खड्ड्यात अडकून हा अपघात झाला.

Priya More

शहापूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये जवानाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्याने या जवानाचा जीव घेतला. कामावर जाताना ही घटना घडली. जवानाची दुचाकी खड्ड्यात अडकली त्यानंतर ते डिव्हायडरला जाऊन धडकले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणे गावातून आपले कर्तव्य निभावण्यासाठी कामावर जात असलेल्या टीडीआरएफ जवानाचा जीव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी घेतला. विकास लहू गोरे असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या जवानाचे नाव होते. नुकताच भिवंडी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत त्यांनी जिवाजी बाजी लावून मदत कार्य केले होते आणि अनेकांचे प्राण वाचवले होते.

शहापूर तालुक्यातील बामणे गावात विकास गोरे ते राहत होते. ते आज सकाळी आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी बुलेटने निघाले. पण वाटेत भयंकर घडलं. शहापूर शहरातील भांरगी नदीच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात त्यांच्या बुलेटचे पुढील चाक अडकले. त्यानंतर विकास गोरे हे रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकले. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुकापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT