MLA Harish Daroda Nephew Dies In Jail Saam Tv
मुंबई/पुणे

MLA Harish Daroda: अजित पवारांच्या आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू, घोटाळा प्रकरणात होता अटकेत

MLA Harish Daroda Nephew Dies In Jail: शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा जेलमध्ये मृत्यू झाला. भात खरेदी घोटाळा प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती.

Priya More

Summary -

  • आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू

  • भात खरेदी घोटाळा प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी अटक

  • आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते

फैय्याज शेख, शहापूर

शहापूरमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरूंगात मृत्यू झाला. दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश दरोडाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. तुरूंगात असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश दरोडाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हरीश दरोडाने आदिवासी महामंडळाच्या भात खरेदीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप होता. या प्रकरणात चौकशीदरम्यान दोन महिन्यापूर्वी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसाकडून त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला कल्याणमधील आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते.

कारागृहात असताना त्याची तब्येत अचानक बिघडल्याने उपचारासाठी त्याला ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचे निधन झाले. या घटनेमुळे शहापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रातील तब्बल पाच हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्याप्रकरणी हरीश दरोडा याच्यावर किन्हवली पोलिस ठाण्यात डिसेंबर २०२३ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी वाजतगाजत अजित पवार गटात हरीश दरोडाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. त्यानंतर घोटाळा प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती.

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांत सुमारे १६ कोटींचा भात खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. या भात खरेदीचा शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रात देखील दीड कोटींचा भात खरेदी घोटाळा उघडकीस आला होता. आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आणि साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा याच्यासह ४ जणांनी शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवून शासनाची आणि आदिवासी विकास महामंडळाची सुमारे दीड कोटींची फसवणूक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुकिंग रद्द केल्याचा राग? वडाळा परिसरात Urban Company थेरपिस्टकडून हाणामारीचा दावा

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

Akola Politics : अकोला महापालिकेत हायव्होल्टेज राजकारण; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, ४ पक्ष एकत्र

SCROLL FOR NEXT