Pimpri Chinchwad Police Station गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवड हादरले; नातेवाइकाच्या घरी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर घटना घडली आहे. नातेवाइकांच्या घरी गेलेल्या एका बारा वर्षांच्या मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर घटना घडली आहे. नातेवाइकांच्या घरी गेलेल्या एका बारा वर्षांच्या मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Pune Police) तात्काळ दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pimpri Chinchwad Crime News)

पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. १८ वर्षांचा तरूण आणि एका २१ वर्षांच्या रिक्षाचालकानं १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. लक्ष्मण क्षीरसागर (वय १८) आणि रोहित सुतार (वय २१) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. यातील रोहित हा रिक्षाचालक आहे. या दोघांविरोधात पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POSCO) गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या नातेवाइकांच्या घरी एकटीच होती.त्यावेळी संशयित आरोपी लक्ष्मण क्षीरसागरने पीडितेला तेथून बळजबरीने उचलून आपल्या घरी नेले. घरातील खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर लक्ष्मणचा मित्र रोहित यानेही तिच्यावर बलात्कार केले. घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकावले. याबाबत कुठे वाच्यता केली तर, तुझ्या कुटुंबातील सर्वांना संपवून टाकू, असे आरोपी तिला म्हणाले.या घटनेने हादरलेल्या पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर नातेवाइकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. आरोपी लक्ष्मण आणि रोहित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संशयित आरोपी लक्ष्मण आणि रोहित या दोघांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT