Seven Bangladeshi women arrested for prostitution in Budhwar Peth pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यातील बुधवारपेठेत अचानक पोलीस धडकले; ७ बांगलादेशी महिलांना अटक

Satish Daud

Pune Budhwar Peth News

मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारपेठ परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक तसेच महिला अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास बुधवारपेठेत धडक मारली. (Latest Marathi News)

अचानक पोलीस धडकताच बुधवार पेठेत (Budhwar Peth) अवैधरित्या वास्तव करणाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी छापेमारी करत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. या महिलांकडे भारतात येण्याचा पुरावा नसल्याचं तपासात उघड झालं आहे.

याप्रकरणी बुधवार पेठेतील कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेलाही सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune News) बुधवारपेठ परिसरात या बांगलादेशी महिला राहत होत्या. यातील बहुतांश महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होते.

ही बाब सामाजिक सुरक्षा दलाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बुधवारपेठेत धडक मारली. बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्याची सामाजिक सुरक्षा दलाची ही महिनाभरातील तिसरी कारवाई आहे. यापूर्वी देखील पथकाने बुधवारपेठेत धडक मारत काही बांग्लादेशी महिलांना अटक केली होती.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलांनी वेगवेगळ्या अमिषाने पुण्यात बोलावल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी फेसबुकवर ओळख करून तुझी भारतात त्वचारोगाची ट्रीटमेंट करून असं सांगून बांगलादेशी महिलेला विमानाने पुण्यात बोलून फसवणूक केल्याचा उघड झालं आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर पीटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT