Cyrus Poonawalla on Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Cyrus Poonawalla on Sharad Pawar: शरद पवार यांची 2 वेळा पंतप्रधान होण्याची संधी हुकली; सायरस पुनावाला यांनी स्पष्ट सांगितलं

Cyrus Poonawalla on Sharad Pawar: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पुनावाला यांनी शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Cyrus Poonawalla on Sharad Pawar:

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांनी निर्णय बदलला. या प्रकारानंतर शरद पवारांचा राजीनामा आणि राजकारण याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. आता याचदरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पुनावाला यांनी शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस सायरस पुनावाला यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुनावाला यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

सायरस पुनावाला म्हणाले, 'शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा दोन वेळा चान्स हुकला. त्यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे. त्यांचं वय झालं आहे. माझं वय झालं आहे. त्यांनी आराम करायला हवा'.

'शरद पवारांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. ते खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यांचे वय झाले असून शरद पवारांनी आता रिटायर व्हावे, असेही ते म्हणाले .

डेंग्यू आणि मलेरियाच्या लसीवर पुनावाला काय म्हणाले, 'सिरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार आहे. डेंग्यूवरील लस वर्षभरात मार्केटमध्ये आणणार आहे. डेंग्यू आजार सध्या देशभरात पसरला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

SCROLL FOR NEXT