Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Death : अजितदादांना राष्ट्रवादीमधील अनेकांनी त्रास दिला, दिग्गज नेत्याचा खळबळजनक दावा

Ajit Pawar latest news : अजित पवार यांना राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्रास दिल्याचा रूपाली ठोंबरे यांचा खळबळजनक दावा समोर आला आहे. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Rupali Thombre allegations about Ajit Pawar explained : अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्रास दिल्याचा खळबळजनक दावा रूपाली ठोंबरे यांनी केला. पुण्यात साम टीव्हीशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप करत गंभीर इशारा दिला. कुठेतरी असं वाटतं की दादा सत्य बोलून गेले की राजकारण वंगाळ झालं आहे. दादांना सुद्धा अनेक लोकांनी त्रास दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादीमधून अजित दादांना त्रास दिला. याबाबत अजितदादा यंनी अनेक लोकांशी बोलले आहेत. जे कोण नेते आहेत, आता तरी सुधारा, दादांच्या बोलण्यावरून संयम ठेवला गेला होता आता संयम राहणार नाही, असा थेट इशारा ठोंबरे यांनी दिला.

संयम पाळतोय म्हणून... औलाद समजू नका

अजितदादांच्या निधनाला आज २१ दिवस होऊन गेले. संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारतोय की पुरावे समोर कधी येणार? आम्ही संयम धरला होता, समाजातील वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. पण सत्य समोर येणार नसेल तर संयम सुटला जाऊ शकतो. संयम सोडायला लावू नका, आम्ही... औलादी नाहीत, अशी आक्रमक भूमिका रूपाली ठोंबरे यांनी आज व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी आमची सुद्धा एक टीम तयार केली आहे. आमच्याकडून सुद्धा पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रूपाली ठोंबरे यांनी दिली.

तपास कसा होणार?

अजितदादांच्या चौकशीसाठी जे प्रश्न समोर आणतील ते सगळे आम्ही घेणार आहोत. पक्षातले नेते बोलत नसतील कारण ते धक्क्यातून सावरले नसतील. सुनेत्रा वाहिनी, पार्थदादा यांना सावरायला अजून वेळ लागेल. झिरवळ, हिंदूराव, वैशाली नागवडे, अमोल मिटकरी आणि मी आम्ही सगळ्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे. तपासाच्या भागात अनेक निवृत्त एजन्सी अधिकारी आहेत, काही एक्सपर्ट आहेत, काही निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी समोर येणे गरजेचे आहे, असे रूपाली ठोंबरेंनी सांगितले. जर मी राष्ट्रवादी सोडली तर मला दादा माफ करणार नाहीत, आता साथ सुनेत्रा वाहिनी यांना पाठिंबा देण्याची गरज आहे आणि तिचं अजित दादांना श्रद्धांजली असेल, असेही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT