गणेश कवडे, मुंबई | साम टीव्ही
पुण्यातील पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेच्या धर्तीवर मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअर विषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करून या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास चालना मिळेल, असा मानस असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZsMPGIodkUXWu5Su2DRtFEVnyWb2SjFepoxkOqUcfdSe97g/viewform) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी लिंकवर जाऊन आपली मते, सूचना व हरकती नोंदवाव्यात,असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.
पेटकेअर संस्थेची गरज काय?
पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (PETE) या उपक्रमाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य दिले जाईल.
आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण या संस्थेत मिळेल.
पेटकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, या क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करणारे नागरिक यांच्यासाठी विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या प्रशिक्षणामध्ये पेट हँडलिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रूमिंग आणि पाळीव प्राण्यांसाठी निवास व देखभाल सुविधा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश असेल.
प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार असून, आधुनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्ये आत्मसात करता येतील.
तसेच, पाळीव प्राण्यांचे आरोग्य, संगोपन आणि कल्याण याविषयी माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही पेट पॅरेंट्ससाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या माध्यमातून पाळीव प्राण्यांना जागतिक दर्जाच्या सेवा व योग्य काळजी मिळण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मदत होईल.
या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास चालना मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.