शाळा ४ आॅक्टोबरपासून सुरु होणार - Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking - राज्यातल्या शाळा ४ आॅक्टोबरपासून सुरु होणार

राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोरोना corona महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा Schools येत्या चार आॅक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहेत

साम टिव्ही

रश्मी पुराणिक, ब्युरो चीफ मुंबई

मुंबई : राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोरोना corona महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा Schools येत्या चार आॅक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहेत. schools in maharashtra to reopen from fourth october

शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे chief minister प्रस्ताव पाठवला होता. गेले काही महिने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे बोलले जाऊ लागल्यावर पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. राज्यात शाळा बंद झाल्यानंतर गेले संपूर्ण वर्ष आणि त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु होते. त्याला अनेक मर्यादा येत होत्या. आता मात्र शाळांचे वर्ग पुन्हा एकदा विद्यार्थांनी गजबजणार आहेत. या शाळा नक्की कशा सुरु केल्या जातील, याबद्दल लवकरच आदेश अपेक्षित आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT