मुंबई : कोरोना (Corona) महामारीमुळे मार्च 2020 पासून बंद असणारे मुंबईमधील 1 ली ते 7 वीचे वर्ग तब्बल पावणे दोन वर्षानंतर आजपासून सुरु करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व माध्यमाच्या 1 ली ते 7 वीचे वर्ग 15 ऑगस्ट म्हणजेच आज पासून सुरू करण्याचे आदेश 30 नोव्हेंबरला दिले होते. दरम्यान काल देखील नव्याने 15 तारखेला प्रत्यक्ष वर्ग खुले करण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. त्यानुसार आजपासून मुंबईतील शाळांचे 1 ली ते 7 वीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार आहेत.
हे देखील पहा -
शाळा School जरी सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना वर्गात बसणं सक्तीचं असणार नाही. ज्या पालकांना आपल्या मुलांना प्रत्यक्ष वर्गात पाठवण्याची इच्छा नसेल, त्यांनी मुलांना घरातूनच ऑनलाईन माध्यमातून वर्गात उपस्थित करणं बंधनकारक असेल. त्यासाठी शाळा प्रशासनाने प्रत्यक्ष वर्ग भरवताना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्याची व्यवस्था करणं शाळांना देखील बंधनकारक करण्यात आलं आहे.
तसंच प्रत्यक्ष वर्ग भरवताना शाळांना पालिकेने Covid -19 च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत. पालकांच संमतीपत्र असल्यास विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याची सुचना, एकत्र येऊन खेळले जाणारे खेळ खेळण्यास परवानगी नाही. शिक्षकांच्या दोन्ही लसींचे डोस झालेलेच असावे. तसंच शाळा सुरु झाल्या असल्या तरीही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणं शाळांना बंधनकारक राहणार आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.