Maharashtra School saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra School News: मोठी बातमी! राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार? समोर आली महत्वाची माहिती

Maharashtra School Re-opens after Summer Vacation: राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये (२०२३-२४) शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत.

Vishal Gangurde

Pune News: राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये (२०२३-२४) शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. तसेच विदर्भातील जून महिन्यातील तापमानाचा विचार करता येथील शाळा ३० जूनपासून सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी २ मेपासून लागू होणार असून ही सुट्टी १४ जूनपर्यंत असणार आहे.प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल २९ एप्रिल रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहीर करावा.

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांच्या दिवशी ती समायोजन करण्यासंदर्भात जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे . (Maharashtra Latest News)

प्रत्येक शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी किमान २०० कार्यदिन आणि प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान ८०० घड्याळी तास, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी किमान २२० कार्यदिन, ते प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान एक हजार तास निश्चित केले आहेत.

त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षात सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार असल्याच नमूद केलं आहे.

आजी आजोबा दिवस साजरा होणार...

येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे 'आजी आजोबा दिवस' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे.  शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: कमी मतं नाहीतर कुटुंब कारण ठरलं? अवेज दरबार बिग बॉस १९ च्या घराबाहेर पडण्याचं वेगळंच गुपित समोर आलं

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

SCROLL FOR NEXT