Maharashtra Monsoon Session news  saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी ! थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीचं विधेयक विरोधकांना अमान्य; सभापतींनी केले मंजूर

थेट जनतेतून संरपंच आणि नगराध्यपदाच्या निवडणुका घेण्याबाबतचे विधेयक सभापतींकडून मंजूर करण्यात आलं आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : थेट जनतेतून संरपंच आणि नगराध्यपदाच्या निवडणुका घेण्याबाबतचे विधेयक सभापतींकडून मंजूर करण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी सरपंच,नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीबाबत विधेयक मांडले होते. सदर विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडले होते. मात्र, विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेत सदर विधेयक अमान्य केले. मात्र, विरोधकांच्या संख्याबळानंतरही परिषदेत विधेयक सभापतींनी मंजूर केले आहे. (Maharashtra Monsoon Session news)

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Assembly Session) आजचा चौथा दिवस आहे. विरोधकांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन केले. विधानभवनामध्ये देखील काल विरोधकांनी सरपंच,नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीबाबत विधेयकावरून सरकारला धारेवर धरलं. थेट जनतेतून सरपंच निवडणुका घेण्याबाबतचे बिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान भवनामध्ये मांडल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बिलाला कडाडून विरोध केला. मात्र, सरपंच,नगराध्यक्ष थेट निवडीचे विधेयक परिषदेत सभापतींनी मंजूर केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान भवनात विधेयक मांडले होते. मात्र, सदर विधेयक विधान परिषदेत नामंजूर करण्याचा विरोधकांनी प्रस्ताव मांडला. सरपंच,नगराध्यक्ष निवड थेट झाल्यास भ्रष्टाचार वाढ होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे. सदर विधेयक हे संयुक्त समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर विरोधकांच्या संख्याबळानंतरही परिषदेत सदर विधेयक सभापतींकडून मंजूर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य

Sindhudurg Tourism : समुद्र अन् Temple कोकणातील ऑफबीट ठिकाणे तुमचं मन मोहून टाकतील! फक्त २ दिवसात करा Explore

'....अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका; सरकारलाही दिला इशारा

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; बिग बॉसमधील या स्पर्धकाची कहाणी ऐकून झाला भावुक

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात?

SCROLL FOR NEXT