santosh deshmukh news  Saam tv
मुंबई/पुणे

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सक्तीवर रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधिशांसोबत धुळवड?

Santosh deshmukh case update : संतोष देशमुख प्रकरणात सक्तीवर रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधिशांसोबत धुळवड साजरी करत असल्याचे समोर आले आहे. निलंबिंत पोलीस अधिकारी न्यायाधिशांसोबत धुळवड साजरी करत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देशमुख प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवड साजरी करताना दिसले. दोन्ही पोलीस अधिकारी हे संतोष देशमुख हत्याकंड प्रकरणात सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड साजरी करताना दिसले. यावरून संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांनी आज धुळवड साजरी केली. त्यांनी ही धुळवड संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी संशयित आरोपी यांच्या सोबत रंगाची उधळण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता आरोपीला वाचणारे निंलबित आधिकाऱ्यांसोबत यांचे लागेबांधे असल्यावर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला शिक्षा होईल का? असा प्रश्न सामानिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या,'संतोष देशमुख प्रकरणात दोन आरोपी होते, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी करत होतो. राजेश पाटील खंडणीची मागणी झाली, त्यावेळी टोळीसोबत होते. प्रशांत महाजन हे आरोपींना मदत करत होते. ते तिरंगा रेस्टॉरंटमध्येही उपस्थित होते. दोन्ही अधिकारी जजसोबत खेळत आहेत. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत. ते बघून काय बोलावं, असा प्रश्न पडला आहे.

'न्यायाधिशांना आचारसंहिता असते. न्यायाधीशांनी नैतिक वर्णन करणे अपेक्षित असते. न्यायाधीशांनी संशयित आरोपींसोबत होळी खेळणे चुकीचे आहे. मी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत नाही. पण यांच्याकडील सुनावणी काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी कोर्टात करणार आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT