Nanavati Hospital Woman Doctor Case: मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जाते मात्र मागील काही दिवसांपासून शहरात महिलांचे खून, विनयभंग, भर रस्त्यात मारहाण, छेडछाड अशा अनेक घटनांमुळे कुठेतरी मुंबई शहराच्या या प्रतिमेला तडा गेल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला मारहाण करत लैंगिक छळ झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टरवर सांताक्रूझ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ज्युनियर डॉक्टरांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याने गेल्या एक वर्षापासून अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी आरोपी डॉक्टर विरोधात भादवी कलम 354, 354 अ 354 ब आणि 506 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस मारहाण करणाऱ्या डॉक्टरचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)
महिला डॉक्टरने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सांगितलं आहे की, संस्थेत रुजू झाल्यापासून एका महिन्यातच तिचा लैंगिक छळ सुरू झाला. आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली, तिला स्वतःकडे खेचले आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी डॉक्टर थांबला नाही," असे तिने सांगितले.
याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, याबाबत गेल्या आठवड्यात उशिरा तक्रार प्राप्त झाली. प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH Act) आणि अँटी-रॅगिंग समिती अंतर्गत ताबडतोब बैठक बोलावली, परंतु पीडित डॉक्टरांनी कारवाईत भाग घेतला नाही."
तर समितीबाबत बोलताना पीडित महिला डॉक्टरने सांगितले की, रुग्णालय लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) समितीने कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा तिने पोलिसांशी संपर्क साधला. "माझा सतत छळ होत आहे. यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे," असे तिने म्हटलं आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.