Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut latest Marathi news
Sanjay Raut on Kirit Somaiya, Sanjay Raut latest Marathi news Saam TV
मुंबई/पुणे

'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'; सोमय्यांवर गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटरवरुन राऊत यांनी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. (Sanjay Raut latest Marathi news)

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी 5600Cr एनएसईएल घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी मोतीलाल ओसवाल या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या साठी खुद्द किरीट सोमय्या हे चौकशीसाठी कंपनीच्या शिपयाच्या घरी गेले तिथे सोमय्या यांनी तमाशा केला. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी 2 लाखांची देणगी मिळाली असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

दरम्यान याआधी १० मे रोजी देखील संजय राऊत यांनी एक ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधला होता. राऊत यांनी मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार आहेत. मेट्रो डेअरी संदर्भात ईडी आणि सीबीआयसीबीआयने चौकशी केली आहे. मात्र, या मेट्रो डेअरीने सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी दिली असा आरोप देखील राऊत यांनी केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे; निलेश लंके

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT